Walmik Karad | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी मानला जाणारा आरोपी वाल्मिक कराडबाबत सातत्याने वेगवेगळे खुलासे होत आहे. यातचा आता वाल्मिक कराडचा नवा कारनामा समोर आला आहे. वाल्मिक हा चित्रपट निर्माता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडकडे एका नामांकित कंपनीचे कार्ड असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याचे राजकीय संबंध समोर आल्यानंतर आता त्याचे थेट फिल्म इंडस्ट्रीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराड सिनेनिर्माता असल्याचे समोर संतोष देशमुख यांच्या हत्या व खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांना आरोपी मानले गेले. त्यांचे सहकारी असलेले सुदर्शन घुले व इतर काही जणांना अटक झाल्यानंतर त्यांच्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या. अशातच आता वाल्मिक कराड सिनेनिर्माता असल्याचे समोर आले आहे. वाल्मिक यांचा एक आयडी कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन या सिनेमात या संघटनेचे ओळखपत्र पाहायला मिळते. या संघटनेचे वाल्मिक कराड हे लाईफ टाईम मेंबर असून बी आर जे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था त्यांची असल्याचे त्यात नमूद केले गेले आहे. या कार्डवर त्यांचा २३४८० असा मेंबर नंबर आहे. याशिवाय बीकेसी येथील याच फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसचा फोटो देखील समोर आला आहे. हे ऑफिस वाल्मिक कराड याचा असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. Walmik Karad | कराडच्या संपत्तीची सतत चर्चा वाल्मिक कराड हा खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडवर अनेक आरोप झाले. कराड याचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यावर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे समोर आले. काही वर्षांपूर्वी एक घरगडी असलेला वाल्मिक कराड आज कोट्यावधींचा मालक आहे, पुण्यासह अनेक ठिकाणी त्याच्या कोट्यवधींच्या जागाही आहेत. कराडने जमवलेल्या या संपत्तीची सतत चर्चा होत असते. यातच त्याचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. Walmik Karad | हेही वाचा: VIDEO : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा पुन्हा चर्चेत; लपूनछपून लंच डेटसाठी आले एकत्र