पुणे | एसपीज् चा आगळावेगळा बिर्याणी फेस्टिव्हल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एसपीज् बिर्याणी यांचा बिर्याणी फेस्टिव्हल सुरू झाला असून, त्याचे उद्घाटन पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल, महाराष्ट्र पोलीस, कारागृह विभागाचे डीआयजी जालिंदर सुपेकर, इन्कमटॅक्स विभागाचे जॉइंट कमिशनर डॉ. संदीप साठे आणि जयंत महाबोले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. फेस्टिव्हलचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे.
एसपीज् बिर्याणी हे अवघ्या बिर्याणीप्रेमींच्या जिभेवरील आणि मनातील नाव! ३० वर्षे खवय्यांना एक से बढ़कर एक बिर्याणीचा आस्वाद देताना एसपीज्ने दरवेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला.
याच प्रयत्नातून बिर्याणी फेस्टिव्हलची भन्नाट कल्पना पुढे आली. एसपीज् बिर्याणीचे सर्वेसर्वा जवाहर चोरगे आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले त्यांचे पुत्र हर्षवर्धन यांच्या कल्पनेतून बिर्याणी फेस्टिव्हलची कल्पना सत्यात उतरवली.
अशा प्रकारचा संपूर्णपणे बिर्याणींचा हा आगळावेगळा फेस्टिव्हल असतो. अगदी सर्वसामान्यांपासून राजकारण, क्रीडा, कला, समाजकार्य विविध क्षेत्रांतील मान्यवर येथे बिर्याणींचा आस्वाद घेण्यासाठी येतात. संगीत क्षेत्रातले दिग्गज संगीतकार अजय-अतुल असो वा बॉलिवूडचा मि. परफेस्टनिस्ट आमीर खान सर्वच जण इथल्या बिर्याणींचे डाय हार्ट फॅन आहेत.
अगदी पर्शियनपासून काश्मिरीपर्यंत आणि इराणीपासून जाफराणीपर्यंत मटण आणि चिकन बिर्याणी इतकी बिर्याणींची वाइड रेंज येथे तुमच्या जिभेची चव वृद्धिंगत करते. यासोबतच रसरशीत राजस्थानी लाल मटण,
बढिया कराची मटण मसाला, फक्कड जत्रा मटण हंडी, चटकदार मटण खर्डा असा एकदम झक्कास बेत येथे चाखायला मिळतो. या नॉनव्हेजसोबतच व्हेज खवय्यांचीही येथे उत्तम खातिरदारी आहे. व्हेज पुलाव, लाजवाब शाही व्हेज बिर्याणी, पनीर मसाला हाही बेत तितकाच स्वादपूर्ती करणारा आहे.
फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरच्या बिर्याणींचा आस्वाद येथे एकाच ठिकाणी घेता येतो. दरवर्षी या फेस्टिव्हलला उदंड प्रतिसाद मिळतो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याच्या एसपीजच्या परंपरेनुसार यंदा मलमल मटण दम बिर्याणी, मलमल मटण पुलाव आणि लजीज खिमा या अत्यंत चविष्ट डिश खवय्यांसाठी तयार केल्या आहेत.


