मसूद अजहरला दुसरा मोठा झटका ; पाकिस्तानने केली कारवाई

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला संयुक्‍त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. त्यानंतर पाकिस्तानने देखील त्याच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे मसूद अजहरला दुसरा मोठा झटका बसला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर पाकिस्तानकडून कारवाई करण्यात आली असून पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी घालण्यात आली आहे.

मसूद अझहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे, यासाठी भारत गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील होता मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जात होता.

दरम्यान, बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानाकडून सातत्याने मसूदच्या वास्तव्याचे ठिकाण बदलले जात असल्याची माहिती सामोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एक प्रकारे मसूदची पळापळ सुरु आहे. बालाकोट एअर स्ट्राइनंतर पाकिस्तानी लष्कराने मसूदला रावळपिंडीच्या बेस हॉस्पिटलमधून बहावलपूर येथील गोठ गन्नी येथे हलवले होते. आता त्याला इस्लामाबादपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरावाला शेखपूरा येथील एका मदरशामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.