तरस भाजून खाल्ल्याप्रकरणी आणखी एकास अटक
Updated On:

पारनेर -तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्यप्राणी भाजून खात असताना वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एक जण ताब्यात घेण्यात आला होता. उर्वरित दोन जण फरार होते. त्यापैकी एकास वन विभागाने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता दि. 25 पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहेत.
कान्हूर पठार येथे दि. 17 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक असणाऱ्या वैदू वस्तीवर तरस जातीचा प्राणी भाजण्यात आला असून त्याला खाण्याची तयारी असल्याची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर या ठिकाणी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी परिक्षेत्राचे सी. ए. रोडे व संदीप भोसले यांनी कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. त्यात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपी सुरेश दत्तू शिंदे याची दि. 25 पर्यंत वन कस्टडी वाढविण्यात आली आहे.





