देशाला मिळणार आणखी एक एअरलाइन, स्वस्तात करू शकणार प्रवास

New Airline | देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार आहे. या नवीन एअरलाइनचे नाव एअर केरळ असून याला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. सरकारकडून एनओसी मिळाल्यानंतर एअर केरळने २०२५ मध्ये आपली सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर ती प्रवाशांसाठी देखील सज्ज होणार आहे.
सुरुवातीला एअर केरळ तीन ATR 72-600 विमाने वापरणार आहे. ते देशातील टियर 2 आणि टियर 3 सारखी लहान शहरे जोडेल. एअर केरळने दुबईत पत्रकार परिषदेत एनओसी मिळाल्याची घोषणा केली आहे. एअर केरळच्या या नवीन विमान कंपनीला दुबईतील दोन बड्या उद्योगपती आफी अहमद आणि अयुब कल्लाडा यांचा पाठिंबा मिळाला आहे. ही विमानसेवा भारताच्या दक्षिण भागातील पहिली प्रादेशिक विमानसेवा असणार आहे.
एअर केरळ ही भारतातील दक्षिणेकडील राज्याची पहिली प्रादेशिक विमान कंपनी असेल Zettfly Aviation नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला ३ वर्षांसाठी हवाई वाहतूक सेवा चालवण्याची परवानगी मिळाली आहे. २०२३ मध्येच, स्मार्ट ट्रॅव्हल्स एजन्सीचे संस्थापक आफी अहमद यांनी त्यांच्या नावावर airkerala.com डोमेन नाव 10 लाख दिरहममध्ये घेतले होते.
केरळ सरकारने 2005 मध्ये पहिल्यांदा या विमान कंपनीची योजना आखली. एका अहवालाचा हवाला देत या विमान कंपनीची उड्डाणे पुढील वर्षापासून उड्डाणासाठी सज्ज होणार असल्याचे समोर आले आहे. लहान शहरांना कमी किमतीत हवाई सेवा पुरवण्याचे एअर केरळचे उद्दिष्ट आहे. एअर केरळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. एअर केरळच्या ताफ्यात २० विमाने आल्यानंतर ही एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकते.



