सातारा – जिल्ह्यात करोनाचा धमाका सुरूच असून 98 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 2557 झाली आहे. तर जिल्ह्यातील आणखी दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत एकूण 87 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे (आरएटी) तपासणी करण्यात आलेल्यांपैकी सातारा व खातगुण येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती मंगळवारी सायंकाळी देण्यात आली. त्यापूर्वी सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 89 आणि रात्री उशीरा अँटिजन टेस्ट किटद्वारे 6 अशा एकूण 95 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या 95 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. वाई तालुक्यातील बोपेगाव येथील 41 व 35 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे येथील 65 वर्षाचा पुरुष, 12 वर्षाचा युवक, 48 वर्षाचा पुरुष व 28 वर्षाची महिला., खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील 38 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 33 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला.,
सातारा तालुक्यातील खावली येथील 30 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 37 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष, शहरातील रविवार पेठेतील 70 वर्षीय महिला, शनिवार पेठेतील 51 वर्षीय महिला व 39 वर्षीय पुरुष, नागठाणे, गणेशवाडी येथील 45 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील वडूज येथील 23, 32 व 26 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58 व 59 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, नेर येथील 63, 45 वर्षीय पुरुष.,
माण तालुक्यातील दहिवडी येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथील 64 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 85 वर्षीय महिला., फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, सासवड येथील 24 वर्षीय महिला, वारेवस्ती, खामगाव येथील 62 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 24, 52, 25, 22, 70, 26 वर्षीय पुरुष, 45 व 20 वर्षीय महिला, साखरवाडी लक्ष्मीवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षाची महिला.
पाटण तालुक्यातील नेरले येथील 51, 52 वर्षीय पुरुष, 45, 15, 28 वर्षीय महिला., महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 20, 18, 36, 27 वर्षीय पुरुष, 20, 25, 46 वर्षाची महिला व 1 वर्षाची बालिका, भिलार येथील 38 वर्षीय पुरुष., कराड तालुक्यातील उंब्रज येथील 62 वर्षीय पुरुष, वराडे येथील 39 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 55 वर्षीय महिला, वराडे येथील 45, 45, 49 वर्षीय पुरुष, कालगाव येथील 20 वर्षीय महिला,
आगाशिवनगर येथील 32 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 36, 63 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, कोळे येथील 34, 25 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 34 वर्षीय पुरुष, बेलवडे बुद्रुक येथील 24 वर्षीय पुरुष, कासारशिरंबे येथील 14 वर्षाची युवती, कराड येथील 34 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 58 वर्षीय पुरुष, कराड येथील 27 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 67 वर्षीय पुरुष,
कराडच्या शनिवार पेठेतील 44 वर्षीय महिला, 16 वर्षाची युवती, मलकापूर येथील 55 वर्षीय महिला, बुधवार पेठेतील 30 वर्षीय महिला, कालवडे येथील 58 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय पुरुष, कराड येथील 18 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
अँटिजन टेस्टनुसार जावळी तालुक्यातील दापवडी येथील 29 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, सातारच्या शाहूनगर येथील 38 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 30 वर्षाची महिला, 4 वर्षाची बालिका, 13 वर्षाचा युवक, सिध्दांतवाडी येथील 34 पुरुष, 3 वर्षाची बालिका, वाई पोलीस लाईन येथील 32 वर्षीय पुरुष असे एकूण 10 जण बाधित झाले आहेत.