दिवसभरात 9 जणांचा मृत्यू पुणे – शहरात करोना बाधितांच्या संख्येने रविवारी पुन्हा 320चा आकडा गाठला. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 9, 656 झाली आहे. तर 203 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 45 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. दिवसभरात करोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत हा आकडा 448 पर्यंत गेला आहे. रविवारी (दि.14) केवळ 213 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर यापूर्वी सॅम्पल घेतलेल्या रुग्णांचे जे अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 320 बाधित आढळले आहेत. कालचे आणि आजचे असे एकूण 1 हजार 132 जणांचे नमुने अहवाल प्रतीक्षेत आहेत. सध्या डॉ. नायडू, ससून आणि खासगी रूग्णालयांत 2,998 बाधितांवर करोना वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तर, दिवसभरात 123 बाधित ठणठणीत बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.