सातारा -जिल्ह्यातील आणखी 27 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने सोमवारी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 845 झाली आहे. जिल्ह्यातील 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 248 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 25 रुग्णांनी आज करोनावर मात केली असून 138 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 7 नागरिकांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सातारा तालुक्यातील वडूथ येथील 63 वर्षीय पुरुष करोनाबाधित असल्याचे त्या हॉस्पिटलने कळविले आहे. जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगा, फलटण तालुक्यातील कोरेगाव येथील 26 वर्षीय महिला, कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथील 44 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील कोयना वसाहत येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 जणांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी सोमवारी सकाळी दिली. या 20 जणांमध्ये जावळी तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण येथील रविवार पेठेतील तीन वर्षीय बालक, खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय तरुणी, सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.
काल रात्री उशिरा पुण्यातील एनसीसीएस यांच्याकडून 171 जणांचा अहवाल
निगेटिव्ह आला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 17, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 30 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 77, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 2, शिरवळ येथील 12, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 24, दहिवडी येथील 49 अशा एकूण 248 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.