Pimpri : श्रमजीवी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पिंपळे गुरव : काळेवाडी, पुणे येथील श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक साधारण सभा नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. संस्थेचा एकूण व्यवसाय सध्या १५० कोटींवर पोहोचला असून, संस्थेकडे ४ कोटींचे भागभांडवल आणि ८ कोटी रुपयांची स्वनिधी आहे.
चालू आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी ६ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यशस्वी आर्थिक कामगिरीमुळे सभासदांना १०% लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ आहे
संजीव राजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संस्थापक विजयसिंह देशमुख, अप्पर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, वारे गुरुजी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष दिपक देशमुख व उपाध्यक्ष सागर गाढवे यांनी यावेळी दोन नवीन कर्ज योजना जाहीर केल्या. सोनेखरेदी कर्ज योजना आणि सौर ऊर्जा प्रकल्प कर्ज योजना, ज्या भविष्यात सभासदांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. सूत्रसंचालन महाव्यवस्थापक विजय वाघमोडे यांनी केले.





