जुन्नर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुन्नर येथील स्वामी विवेकानंद सायम शाखेचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. खत्री हायस्कूलच्या मैदानात हा उत्सव साजरा करण्यात आला. शाखेतील स्वयंसेवक आणि तालुका कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. उत्सवासाठी शाखेतील बाल स्वयंसेवकांचे पालक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद शाखेच्या स्वयंसेवकांनी एक तासाच्या शाखेमध्ये होणारे खेळ आणि प्रात्याक्षिक केले. त्यामध्ये नियुद्ध मनोरा, सूर्यनमस्कार आणि मनोरंजक आणि बुद्धी वर्धक खेळ साकारण्यात आले.
प्रमुख पाहुणे शिपिंगुे डायरेक्टर प्रदीप पवार आणि प्रमुख वक्ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरू आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहबौध्दिक प्रमुख डॉ. प्रसाद जोशी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रसाद जोशी यांनी मार्गदर्शन केले. तालुका बौद्धिक प्रमुख दिनकरराव साळवे यांनी सूत्र संचालन केले. प्रार्थना होऊन उत्सवाची सांगता झाली.