#Annasahebpatil : ‘नरेंद्र पाटील’ यांच्याकडे पुन्हा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद

पाचगणी : नवी मुंबई वाशी येथे स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आण्णासाहेब पाटील यांचे चिंरजीव व माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी घोषणा केली आहे.
📍Live | माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी झटलेले थोर नेते कै. अण्णासाहेब पाटील यांची 89वी जयंती व भव्य माथाडी कामगार मेळावा | नवी मुंबई #annasahebpatil #maharashtra https://t.co/mTa7Sf9fIt
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2022
माथाडी नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील हे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्याच्याकडील हे पद काढून घेण्यात आले होते. मात्र नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रभर आपला झंजावात सुरु ठेवत सर्वसामान्य माथाड्याला जागं करण्याच काम नेहमी सुरु ठेवल आहे.
आज मुंबई येथे स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासह उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस या दोघांनी याबाबत महत्वपुर्ण घोषणा केल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी ट्वीटरवर ट्विट करत दोघांचे आभार मानले आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्याची घोषणा केल्याबद्दल महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारचे मुख्यमंत्री मा.श्री.@mieknathshinde साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis साहेब यांचे मनःपूर्वक आभार!!
— Narendra Patil (@NarendraMathadi) September 25, 2022
दरम्यान, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अध्यक्ष पद देवून शिंदे-फडणवीस सरकारने माथाडी कामगारानमध्ये आनंद पेरला आहे. माथाडीच्या नेत्याला वडिलांच्या जयंती निमीत्त दिलेली भेट माथांडी कामगांराना बळ देणारी ठरली आहे हे मात्र निश्चित .


