Jamkhed News :”आण्णा द बॉस” साऊथची क्रेझ महाराष्ट्रात! आमदार सुरेश धसांचे जामखेडमध्ये २८ फुट उंचीचे कटआऊट

जामखेड : चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमातील ‘अण्णा के जैसा चष्मा लगा के’, लुँगी डान्स हे गाणं गाणं बरंच हिट ठरलं होतं. आजही या गाण्याची जादू काही कमी झालेली नाही. अगदीच त्या प्रमाणेचे जामखेड शहरातील गजबजलेल्या खर्डा चौकात रस्त्याच्या डिव्हायडरच्या मधोमध साऊथ इंडियनच्या हिरोप्रमाणे आमदार सुरेश धस यांचा २८ फुट उंचीचा बॅनर लावला आहे.
या बॅनरवर सुरेश धस यांनी पांढरा शर्ट व पांढरी लुंगी गुडघ्याच्यावर नेसलेली असून काळा चष्मा घातलेला व पूर्ण पांढरी दाडी व अमिताभ बच्चन टाईप एक हाथ पुढे व एक हात सरळ ठेवलेला असा केरळ चा आण्णा असा वेशभूषेत असलेला हटके बॅनर श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लावला आहे.
सदर बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सदर बॅनर जामखेड येथील त्यांचा चाहता गणेश डोंगरे यांनी लावला. या बॅनरची जोरदार चर्चा जामखेड शहरात होत असून लक्षवेधी ठरला आहे. शहरात मोठय़ा प्रमाणावर लागलेल्या कमानी व बॅनरने शहर गजबजून गेले आहे. परंतु आपल्या नेत्याचा वेगळ्या वेशभूषेत बॅनर डोंगरे यांनी लावून सर्व बॅनर व कमानीवर मात केली आहे.
आष्टी पाटोदा व शिरूरचे आमदार सुरेश आण्णा धस हे जामखेड तालुक्याला चांगले परिचित आहे. त्यांना मतदार संघात जाण्यासाठी जामखेड वरून जावे लागते. त्यांची कामाची पद्धत व जनतेशी असलेला जिव्हाळा पाहता त्यांचे कर्जत जामखेडमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. २०१६ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पक्षाने त्यांना जामखेड नगरपरिषद निवडणूकीची जबाबदारी दिली होती. त्यांनी बलाढ्य असलेले भाजपचे नेते व तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव करून राज्याचे लक्ष वेधले होते.
कधीही हाकेला ओ देणारा नेता चोवीस तास जनतेच्या प्रती उपलब्ध असतो. सर्वसामान्य नागरिकांना ते आपलेसे वाटतात त्यामुळे त्यांची नेहमी राज्यात चर्चा आहे. सुरेश आण्णा धस यांचा खास पेहराव मधील आण्णा द बॉस हा बॅनर पाहण्यासाठी लोक गर्दी करतात यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाने शहरातील दोन कि. मी. परिसरात पोलीस व होमगार्ड बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर लागलेल्या कमानी व अस्ताव्यस्त लागत असलेली चारचाकी वाहने यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.





