Anmol Bishnoi । नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समावेश केला असून त्याच्या अटकेवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोई कॅनडा आणि अमेरिकेतून आपल्या टोळीचे साम्राज्य चालवत आहे. 12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्याचा कट आणि एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या कटातही त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल रोजी खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी अनमोलविरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला शूटर स्नॅपचॅटच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात होता, असेही तपासात समोर आले आहे. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती 12 ऑक्टोबरच्या रात्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दिकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यादरम्यान तीन सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर लगेचच लॉरेन्स बिश्नोई टोळीतील संशयित शुभम लोणकर याने सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी स्वीकारली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे अमेरिका आणि कॅनडातील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच, ते भारतातील ग्राउंड लेव्हलवर गुन्हेगार आणि ऑपरेटिव्ह यांच्या सक्रिय सहकार्याने गुन्हेगारी सिंडिकेटवर देखरेख करतात. अनमोलच्या नावावर 10 लाखांचे बक्षीस जाहीर Anmol Bishnoi । सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, चंदीगड, राजस्थान, दिल्ली, यूपी, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये पसरलेली आहे. या टोळीतील लोकांसाठी परदेशातून शस्त्रांची व्यवस्था केली जाते. ही शस्त्रे बहुधा अनमोल, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्सच्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी मांडलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल हे सर्व कट कॅनडातून चालवतो आणि अनेकदा अमेरिकेत जातो. एनआयएने म्हटले आहे की, आम्ही त्याला आमच्या मोस्ट वॉन्टेड यादीत ठेवले असून त्याच्या ठावठिकाणाबाबत माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. NIA ने ‘या’ नेटवर्कला म्हटले नवीन अंडरवर्ल्ड Anmol Bishnoi । पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोलचे दुसरे नाव भानू आहे. मे 2022 मध्ये गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा आदेश देण्यातही त्याचा सहभाग होता. लॉरेन्स बिश्नोई हे गेल्या वर्षी ऑगस्टपासून साबरमती तुरुंगात आहेत. एनआयएने या संपूर्ण नेटवर्कचे नवीन अंडरवर्ल्ड असे वर्णन केले आहे. गुंडांच्या कारवायांबाबत मार्च २०२३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, “गुंड आणि पीकेई यांचे हे संगनमत आणि त्यांचे गायक, कबड्डी खेळाडू आणि वकील इत्यादींशी असलेले संबंध, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटापूर्वीच्या काळाच्या धर्तीवर कार्यरत आहेत.” आहेत.