अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीची चर्चा

Ankita Lokhande । बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेत अर्चना ही व्यक्तिरेखा साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिला इतकी पसंती मिळाली की ती घराघरात प्रसिद्ध झाली. अभिनेत्रीने 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले.अशात आता लग्नाच्या 3 वर्षानंतर ती खुशखबर देणार आहे. याबाबत या जोडप्याच्या जवळच्या मित्रानेच खुलासा केला आहे. यादरम्यानच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
सध्या अंकिता तिच्या पतीसोबत लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे. शोचा ऑफ कॅमेरा शूटचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाफ्टर शेफची संपूर्ण टीम एकत्र बसून चिल करताना दिसत आहे. दरम्यान, या शोचा को-स्टार अली गोनी याने अंकिता प्रेग्नंट असल्याचे संकेत दिले आहेत. अली गोनी या जोडप्याला म्हणाला, ‘छोटा जैन येत आहे, छोटा जैन येत आहे’ हे ऐकून विकी जैन हसायला लागतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.मात्र, यात किती सत्यता आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. अंकिता लोखंडे आणि विकी जैन बिग बॉस 17 मध्ये दिसले होते आणि शोमध्ये त्यांच्या प्रेग्नेंसीची खूप चर्चा झाली होती. मात्र, शो संपल्यानंतरही या जोडप्याला हा प्रश्न विचारला जात आहे.
अंकिताच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री याआधी स्वतंत्र वीर सावरकर या चित्रपटात दिसली होती. पवित्र रिश्ता नंतर अंकिताला अनेक हिट चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, पण काही कारणास्तव ती करू शकली नाही. अभिनेत्री मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, बागी 3 या चित्रपटांमध्येही दिसली आहे. आता ही अभिनेत्री आम्रपालीमध्ये दिसणार आहे.





