Anit Padda : फॅन्स, पापाराझांची फोटोसाठी विनवणी अनित पड्डा लाजली अन्…; सैयारामधील अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

Anit Padda : ‘सैयारा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता अभिनेत्री अनिता पड्डा हि नॅशनल क्रश बनली आहे. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घालत आहे. आतापर्यंत तब्बल २०० कोटीचा गल्ला चित्रपटाने गोळा केला आहे. ही एका रोमँटिक चित्रपटासाठी कौतुकाची बाब आहे. सैयारामधील अभिनेत्री अनित पड्डा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री विमानतळावर आल्यानंतर आल्यानंतर चाहते आणि पापाराझींनी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिला आग्रह केला. मात्र, तिने मला लाज वाटत आहे असे म्हणत सर्वांना गोड स्मित हास्य देत निघून गेली. विमानतळावर अनितला पाहल्यानंतर पापाराझींनी तिचे फोटो काढायला आणि व्हिडीओ रेकॅार्ड करायला सुरूवात केली.
यावेळी अनित निळा शर्ट आणि पांढरी पॅन्ट अशा हटक्या लूकमध्ये दिसली. तिने डोक्यावर टोपी घातली होती आणि तिचा चेहरा काळ्या मास्कने झाकलेला होता. जेव्हा पापाराझींनी अनित पड्डाला थांबवले आणि तिचे एकामागून एक फोटो काढू लागले, तेव्हा तिने सांगितले की उशीर होत आहे. पण तरीही पापाराझी थांबले नाहीत, म्हणून अभिनेत्री म्हणाली मला लाज वाटत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
अनित पड्डा आणि अहान पांडे यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आलेख सतत वर जात आहे. सैयारा हा केवळ सर्वाधिक कमाई करणारा रोमँटिक चित्रपट बनला नाही, तर या चित्रपटाने इतर अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अनित पड्डाच्या या सुपरहिट चित्रपटानंतर, तिला अनेक प्रोजेक्ट्स ऑफर येत असल्याची चर्चा आहे.





