Aniruddhacharya Maharaj: वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज हे त्यांच्या हजरजबाबीपणा आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच, त्यांनी नीट पेपरफुटीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एकाच खळबळ उडाली असून, त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे वादग्रस्त वक्तव्य तीन दिवसांपूर्वीचे आहे. यामध्ये त्यांनी नीट पेपरफुटीसंदर्भात सरकार आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या एका कथेदरम्यान एका भक्ताच्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी या संपूर्ण घटनेला देशातील एक मोठा घोटाळा म्हटले आहे. एका भक्ताने विचारलेला प्रश्न Aniruddhacharya Maharaj: या वादग्रस्त वक्तव्यानंतर, त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भक्ताने स्वामी अनिरुद्धाचार्य यांना नीट पेपरफुटीबद्दल प्रश्न विचारला होता. यामुळे लाखो तरुण व्यथित झाले आहेत आणि काहींनी आत्महत्याही केली आहे. Aniruddhacharya Maharaj: ज्या लोकांनी इतकी मेहनत केली आणि इतका पैसा खर्च केला, त्यांच्या परीक्षा आता रद्द झाल्या आहेत. सरकार या समस्येकडे लक्ष का देत नाही? ते म्हणाले की, या तरुणांसोबत असे होता कामा नये. सरकारने तात्काळ कारवाई करावी. स्वामी अनिरुद्धाचार्य यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. तरुण कठोर परिश्रम आणि लाखो रुपये खर्च करतात. Aniruddhacharya Maharaj: पुढे बोलताना स्वामी अनिरुद्धाचार्य यांनी गंभीर आरोप केले की, “शिक्षणानंतर तरुणांनी नोकरी शोधू नये आणि त्याऐवजी तुटपुंज्या सरकारी अनुदानावर अवलंबून राहावे, अशा प्रकारे व्यवस्थेची रचना केली जात आहे. म्हणजे सरकारची इच्छा आहे की तुम्ही वाचू नका, शिकू नका, कारण तुम्ही शिकलात, सुधारलात तर तुम्ही सरकारकडे नोकऱ्या मागायला लागाल. सरकारला तर असं वाटतं तुम्ही न शिकता त्यांच्याकडून महिना १००० ते ५००० घ्यावं आणि गप्प राहावं. जेणेकरून त्यांची राजकीय वोट बँक कायम राहील.” असा आरोप त्यांनी केला.” त्यांनी चिंता व्यक्त केली की, विद्यार्थी अनेक वर्षांची मेहनत आणि लाखो रुपये खर्च करतात, परंतु पेपरफुटीमुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होते. त्यांनी उपहासाने म्हटले की, जेव्हा परीक्षेची फेरपरीक्षा होते, तेव्हापर्यंत अनेक उमेदवारांनी आपले वय आणि संधी दोन्ही गमावलेले असतात. सरकारला वाटते की तुम्ही त्यांच्याकडून दरमहा १०००-५००० रुपये घेत राहावे आणि शिक्षण घेऊ नये.” असा आरोप देखील पुढे बोलताना त्यांनी केला.