वाघोली (पुणे) – येथील अनिल सातव यांनी संघटना मजबुत करून, वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची पश्चिम महाराष्ट्र सैनिक फेडरेशनकोर कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवडकरण्यात आली. सर्व आजी, माजी सैनिक संघटना यांनी एकत्र येऊन त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी, समस्या, स्थानिक पातळीवर शेतजमीन मालमत्ता संदर्भात होत असलेले वादविवाद सोडवण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात आजी-माजी सैनिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून विशेषतः ग्रामीण शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना सर्वांनी एकत्र करून संघटना मजबुत करणे गरजेचे असल्याचे मत सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, डी. एफ. निंबाळकर, सुभाष दरेकर, टी. एम. सूर्यवंशी, नितीन गावकर, फ्लेचर पटेल, आनंद ठाकूर, संपत दिघे, संजय दळवी आदी उपस्थित होते.