मुंबई – हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनय, डायलॉग आणि सतरंगी डान्सने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते ‘अनिल कपूर’ नेहमीच आपल्या हटके अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत असतात. ते नेहमीच सोशल माध्यमांमध्ये ऍक्टिव्ह असून आपल्या चाहत्यांशी वेगवेगळ्या मुद्यावर ते संवांद साधत असतात. यातच पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरील त्यांच्या अशाच एका संवादाची चर्चा जोरात सुरु आहे.
Tumhi mala bolva , mi kadhi he yahen @aditiraval 👍 https://t.co/SkpEpWAi5n
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 30, 2020
अनिल कपूर AK vs AK या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याच चित्रपटानिमित्त नुकताच त्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहतीने गुजरातीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनिल कपूर यांनी थेट मराठीत उत्तर दिलं आहे.
सध्या त्यांनी दिलेलं मराठी भाषेतील उत्तराचे सोशलवर चांगलेच व्हायरल होत आहे. अनिल कपूर उत्तर दिल्याचे कारण विचारतांना त्याने उत्तर दिल, की अदितीला मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिलं. “तुम्ही मला कदीही बोलवा मी कधीही येईन” असं झक्कास उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिलं.