अनिल गोटेंचा आरोप खरा ठरला; विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 उघडताच सापडलं कोट्यावधीचं घबाड

Dhule Crime News | शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. याबाबतची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अनिल गोटे यांनी खोली क्रमांक 102 बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले.
अखेरीस पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी खोली क्रमांक 102 चे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला. यावेळी खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळली आहे.
अनिल गोटेंची टीका
तब्बल सहा तासांच्या रोकड मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करत रोकड जप्त केली आहे. दरम्यान खोलीतून रोकड मिळाल्याने मी केलेला आरोप सिद्ध झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे भ्रष्ट चरित्र समोर आले असल्याचं म्हणत माजी आमदार गोटे यांनी जोरदार टीका केली. Dhule Crime News |
एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचं बक्षीस दिलं जातं… धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली असेल का? आणि म्हणून त्यांना ‘बक्षिस’ देण्यासाठी कोट्यवधी रुपये रक्कम जमा केले असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे आ. अनिल गोटे साहेब…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2025
रोहित पवारांचे ट्वीट –
या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, ‘एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचं बक्षीस दिलं जातं. धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली असेल का? आणि म्हणून त्यांना ‘बक्षिस’ देण्यासाठी कोट्यवधी रुपये रक्कम जमा केले असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे अनिल गोटे साहेब त्या १०२ क्रमांकाच्या खोलीत अचानक हजर झाले आणि त्यांच्यामुळं अंदाज समितीच्या ‘दैदिप्यमान कामगिरी’वर आणि ‘बक्षिस’ म्हणून मिळणाऱ्या रकमेवरही पाणी फेरलं गेलं,’ असे त्यांनी म्हटले आहे. Dhule Crime News |
दरम्यान, महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही समिती धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेणार आहे. या समितीमध्ये विधिमंडळातील 29 आमदारांचा समावेश असून, आमदार अर्जुन खोतकर हे या समितीचे प्रमुख आहेत. तर त्यापैकी 11 आमदार धुळ्यात दाखल झाले आहेत. दरम्यान विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठीच ही रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप आहे. या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? हे पहावे लागणार आहे. Dhule Crime News |
हेही वाचा:





