अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; मनी लाँड्रिंगप्रकरणी जामीन फेटाळला
Updated On:

मुंबई – मनी लॉन्ड्रींग प्रकरणात मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे देशमुखांची न्यायालयीन कोठडी वाढली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा हा जामीन अर्ज नाकारला आहे. १०० कोटी वसुली आणि मनी लॉड्रींग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
अनिल देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर रोजी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात पीएमएलए कोर्टाने अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.




