अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला
Updated On:

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. हा निर्णय देशमुख आणि राज्य सरकारला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए कोर्टाने आज दिला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.
100 कोटी वसुली आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांप्रकरणी ईडीचा काही दिवसांपूर्वीच तपास पूर्ण झाला होता. ईडीकडून जवळपास 7 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.



