Anil Deshmukh on Ajit Pawar Group :”ज्या ८३ वर्षांच्या बापाच्या जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखलित, त्यालाच हुकूमशहा म्हणता ; अनिल देशमुखांची अजित पवार गटावर टीका

Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) झालेल्या बंडाने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बंडापासून शाब्दिक युद्ध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अजित पवार गटावर (Ajit Pawar Group) सडकून टीका केली आहे.
अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी याविषयी ट्विटरवर एक ट्विट केले असून त्यात त्यांनी,”ज्यांच्या जीवावर सत्तेची फळं चाखलीत, त्याच बापाला हुकूमशाह म्हणत आहात, थोडी तरी लाज बाळगा, असं म्हणत अनिल देशमुखांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. त्यासोबतच “हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढून निवडणुका लढवा”, असे आव्हानही अनिल देशमुखांनी अजित पवार गटाला दिले आहे.
ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं. त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखलित. स्वतःची संस्थानं उभी केलीत, आज त्याच बापाला तुम्ही हुकूमशहा म्हणत आहात. थोडी तरी लाज बाळगा!
तुमच्यात हिम्मत असेलच तर स्वतःचा पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा…— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 10, 2023
अनिल देशमुखांनी(Anil Deshmukh) ट्विटमध्ये , “ज्या 83 वर्षांच्या बापानं तुम्हाला मोठं केलं. त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखलित. स्वतःची संस्थानं उभी केलीत, आज त्याच बापाला तुम्ही हुकूमशहा म्हणत आहात. थोडी तरी लाज बाळगा.” तसेच, “तुमच्यात हिम्मत असेलच तर स्वतःचा पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.”, असेही म्हटले आहे.
सध्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटानं युक्तिवाद करताना शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला, तसेच, परस्पर पत्र काढून ते नियुक्त्या करत होते, असा आरोप केला होता. तर शरद पवार गटानं पक्षाचं चिन्ह गोठवू नये, अशी मागणी आयोगाकडे केली होती. या सुनावणीत शरद पवारांचा उल्लेख हुकूमशाह केल्यावरुन शरद पवार गटानं अजित पवार गटावर जोरदार प्रहार केला आहे. तसेच, अनेकांनी अजित पवार गटावर टिकास्त्रही डागली आहेत.





