Shilpa Shinde | ‘भाभीजी घर पर है‘ या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. यातील कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेतील अंगूरी भाभी हे पात्र कायमच चर्चेत राहिले आहे. सुरुवातीला अभिनेत्री शिल्पा शिंदे भाभीजीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र ही मालिका यशाच्या शिखरावर असतानाच शिल्पाने मालिका सोडली होती. मात्र आता शिल्पा शिंदे जवळपास 10 वर्षांनंतर पुन्हा शोमध्ये परत आली आहे. यामागचे कारणही तिने मुलाखतीमध्ये सांगितले आहे. शिल्पा तिच्या कमबॅकसाठी भावुक होत म्हणाली, “नव्या आणि मजेशीर गोष्टीसह प्रेक्षकांना जुनी अंगुरी भाभी पाहायला मिळणार आहे. १० वर्षच काय २० वर्षही लागू शकत होते कारण मी परत येईन याचा विचारच केला नव्हता. मी सत्याचा रस्ता अवलंबला, जो खूप कठीण असतो. पण मला हे माहित होतं की मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे माझ्यासोबत काहीही चुकीचं होणार नाही. प्रेक्षक मला पाहून ज्याप्रकारे खूश झाले आहेत तर मी सांगू इच्छिते की मी प्रेक्षकांसाठीच परत आले आहे.” Shilpa Shinde | ती पुढे म्हणाली, “मी प्रेक्षकांना हसवायला आले आहे. त्यांच्या ज्या आशा आकांक्षा संपल्या होत्या त्या पुन्हा जाग्या करायला आले आहे. जेव्हा माझी इच्छा होती तेव्हा मला कोणीच करु दिलं नाही. पण मी सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घेतल्या.” लोकांच्या प्रेमाबद्दल बोलतान शिल्पा शिंदे म्हणाली की, जर भाभीजी २.० म्हणजे शिल्पा शिंदे असे म्हटले जात असेल तर हे मी कमावले आहे. दरम्यान, २२ डिसेंबरपासून ‘भाभीजी घर पर है’ २.० सुरू झाले आहे. मजेदार आणि नवीन कथानकासह लोकांना आता जुनी अंगूरी भाभी पाहण्याची संधी मिळाली आहे. हेही वाचा: Ahaan Panday Birthday: ‘मला तुझा अभिमान आहे…’ अहान पांडेच्या वाढदिवसानिमित्त अनीत पड्डाची भावनिक पोस्ट