Aneet Padda : मधुबालाच्या बायोपिकमध्ये ‘सैयारा’ फेम अभिनेत्री? इंडस्ट्री सोर्सकडून खुलासा
Aneet Padda :

Aneet Padda : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये कोण भूमिका साकारणार? असा सवाल केला जात आहे. गेल्या वर्षभरापासून अभिनेत्री कियारा अडवाणी मधुबाला यांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे वृत्त समोर येत होते.
त्यानंतर काही रिपोर्टमध्येच्या दाव्यानुसार, कियारा नाही तर ‘सैयारा’ फेम अभिनेत्री अनीत पड्डाचं नाव फायनल करण्यात आल्याचेही सांगण्यात आलं. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं यशराज फिल्म्सकडून सांगण्यात येत आहे.
अनीत पड्डाही मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये दिसणार नाही. एका रिपोर्टनुसार, या सगळ्या अफवा असून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
चित्रपटात अनित पड्डाला कास्ट केल्याचे दावे खोटे आहेत, असं यशराज फिल्म्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मधुबाला यांची भूमिका पडद्यावर कोण साकारणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कियारा अडवाणी सुरुवातीला शक्ती शालिनी मध्ये काम करणार होती, परंतु तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या प्रोजेक्टमधून माघार घेतली.
अनीत पड्डा हिने २०२५ मध्ये ‘सैयारा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून तो ‘जेन झी’चा (Gen Z) अत्यंत आवडता चित्रपट ठरला. या चित्रपटातून अनीतसोबत अहान पांडे यानेही पदार्पण केले होते. मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली.
हेही वाचा:





