#IPL2022 | अँडी फ्लॉवर पाक सोडून भारतात परतले

कराची – झिम्बाब्वेचे माजी कसोटीपटू अँडी फ्लॉवर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत लखनौ संघाचे प्रशिक्षक म्हणून करारबद्ध झाले आहेत. त्यांच्याकडे पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) मुल्तान सुल्तान संघाचेही प्रशिक्षकपद असून ही स्पर्धा सुरु असतानाही ते आयपीएल लिलावासाठी भारतात परतले आहेत. म्हणजेच जागतिक स्तरावर कोणत्याही अन्य टी-20 लीगपेक्षा आयपीएलच जास्त महत्वाची आहे हेच यातून दिसत आहे.
आयपीएलचा यंदाच्या स्पर्धेसाठीचा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे. अँडी देखील पीएसएल सोडून भारतात परतले आहेत. झिम्बावेचे एकेकाळचे सर्वात यशस्वी क्रिकेटपटू असलेले फ्लॉवर मुल्तान सुल्तानचे प्रशिक्षक आहेत.
गेल्या वर्षी मुल्तान सुल्तानने पीएसएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, तरीही त्यांनी आयपीएललाच महत्व देत भारतात येण्याचा निर्णय घेतला. लिलाव पूर्ण झाल्यावर ते 13 फेब्रुवारीला पाकिस्तानला परतणार आहेत.





