Andy Burnham : ॲंडी बर्नहॅम यांनी स्वीकारला ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार
ब्रिटनमधील लेबर पार्टीचे नवीन नेते अँडी बर्नहॅम (Andy Burnham) यांनी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून आज सूत्रे स्वीकारली. कीर स्टार्मर यांनी लेबर पार्टीच्या नेतेपदाचा राजीनमामा दिल्यामुळे ब्रिटनचे राजे चार्ल्स - तिसरे यांनी बर्नहॅम यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले.

Andy Burnham : ब्रिटनमधील लेबर पार्टीचे नवीन नेते अँडी बर्नहॅम (Andy Burnham) यांनी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून आज सूत्रे स्वीकारली. कीर स्टार्मर यांनी लेबर पार्टीच्या नेतेपदाचा राजीनमामा दिल्यामुळे ब्रिटनचे राजे चार्ल्स – तिसरे यांनी बर्नहॅम यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले.
कीर स्टार्मर यांनी आज सकाळी राजे चार्ल्स यांची भेट घेतली आणि पंतप्रधानपदाचा (Andy Burnham) राजीनामा सादर केला. चार्ल्स यांनी हा राजीनामा स्वीकारला असल्याचे बकिंगहॅम राजवाड्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
बर्नहॅम यांची गेल्या आठवड्यातच लेबर पार्टीच्या नेतेपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर लगेचच ते पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतील आणि आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली गेली होती. बर्नहॅम हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षातले पाचवे पंतप्रधान असून देशात स्थिर आणि उत्तरदायी राजकारण निर्माण करण्याची आशा त्यांच्याकडून केली जाते आहे.
राजे चार्ल्स यांची भेट घ्यायला जाण्यापुर्वी स्टार्मर यांनी १० डाउनिंग स्ट्रीट येथून आपले पंतप्रधान म्हणून अखेरचे संबोधन केले. माझे काम झाले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानपदावरून आपण पायउतार होणार असल्याचे त्यांनी गेल्या महिन्यातच जाहीर केले होते. आता आपल्या पदाची सूत्रे (बॅटन) बर्नहॅम यांच्याकडे सुपूर्द करत असून त्यांना आपला पुर्ण पाठिंबा असल्याचेही स्टार्मर म्हणाले.
मी आनंदाने, स्मितहास्य करत चाललो आहे. आपण जे काही साध्य केले आहे, त्याबद्दल माझ्या मनात अभिमान आहे, असे सांगून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. या निरोपाच्या प्रसंगी मंत्रिमंडळातील (Andy Burnham) त्यांचे सहकारीही उपस्थित होते.






