Andhra Pradesh Bus Tragedy : आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक भीषण रस्ते अपघात घडला. एका खासगी बसची टिपर लॉरीला धडक बसल्याने बसला आग लागली. यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला. यात अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. पोलिसांनी सांगितले की, अनेक जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील निर्मल येथून नेल्लोरला जाणाऱ्या हरिकृष्णा ट्रॅव्हल्सच्या बसची एका टिपर लॉरीला धडक बसल्याने सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या धडकेनंतर बसला भीषण आग लागली आणि अनेक प्रवासी जळून खाक झाले. मार्कापुरमचे डीएसपी नागराजू यांनी दिली माहिती Andhra Pradesh Bus Tragedy : मार्कापुरमचे डीएसपी नागराजू यांनी,”सुमारे आठ जण जळून खाक झाले असून, अंदाजे १८ जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” सांगितले. जिल्हा पोलिसांनी याबाबत, “अंदाजे २० जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत” असे म्हटले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. Andhra Pradesh Bus Tragedy : मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला Andhra Pradesh Bus Tragedy मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी रस्ते अपघातावर तीव्र शोक व्यक्त केला. अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याचे ऐकून आपल्याला तीव्र दुःख झाल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला, परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांची पाहणी केली. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडूनही शोक व्यक्त Andhra Pradesh Bus Tragedy : माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांनीही अपघातावर शोक व्यक्त केला. एका खासगी बस आणि टिपर लॉरीच्या धडकेत इतक्या लोकांनी आपले प्राण गमावणे ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे ते म्हणाले. जखमी प्रवाशांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत, असे लोकेश म्हणाले. मृतांच्या कुटुंबीयांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे ते म्हणाले. त्यांनी जखमी प्रवाशांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.