Ravi Mohan : तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री होण्याअगोदर जोसेफ विजय यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यांची पत्नी संगीता सोर्णलिंगम यांनी विजय यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज देखील दाखल केला असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवी मोहन चर्चेत आला आहे. त्याची पत्नी आरती रवी हिच्यासोबत घटस्फोटाचा खटका न्यायालयात सुरू आहे. तसेच त्याची कथित गर्लफ्रेंड केनिशा हिने देखील रवी मोहनच्या आयुष्यातून काढता पाय घेतला आहे. यामुळे अभिनेता गेल्या काही दिवसांपासून तणावात असून, नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपले दुःख व्यक्त करत आपली बाजू मांडली. यावेळी तो ढसाढसा रडला. सोशल मीडियावर रवि मोहनचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. चेन्नईतील अलवरपेट येथे माध्यमांशी बोलताना रवी मोहनने “जोपर्यंत त्याच्या घटस्फोटाचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत तो चित्रपटांमध्ये काम करणार नाही. तसेच त्याचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही, अशी मोठी घोषणा त्याने यावेळी केली. #WATCH | Chennai, Tamil Nadu: Tamil actor Ravi Mohan broke down while addressing a press conference. Speaking at the press conference, he said, “I will not work in films until I get a divorce. If anything happens to me, that family will be held responsible. They (my wife’s… pic.twitter.com/uHjfGYoaWK — ANI (@ANI) May 16, 2026 “इतका काळ गप्प राहणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी आता आणखी गप्प राहू शकत नाही. जोपर्यंत माझा घटस्फोट होत नाही, तोपर्यंत मी अभिनय करणार नाही.” असे यावेळी बोलताना अभिनेत्याने स्पष्ट केले. तामिळ चित्रपटसृष्टीत रवी मोहन हा एक नावाजलेला अभिनेता असून, त्याचे चाहते विविध राज्यात आहे. जे त्याच्या चित्रपटांची मोठी उत्सुकतेने वाट पाहत असतात. अभिनत्याने घेतलेला निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी धक्का देणारा आहे. पत्नीवर गंभीर आरोप त्याला त्याच्या मुलांना भेटू दिले जात नव्हते आणि तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. तसेच त्याची पत्नीने लग्नासाठी दबाव टाकला होता, असा धक्कादायक आरोपही अभिनेत्याने केला आहे. दरम्यान, गायिका केनिशा फ्रान्सिसबद्दलही त्याने भाष्य केले तो म्हणाला, की तिला (केनिशा) सोशल मीडिया आणि सायबरबुलिंगद्वारे त्रास दिला जात होता. अभिनेत्याने केलेल्या या सर्व आरोपांमुळे तामिळ चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. केनिशानेही अलीकडेच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने म्हटले होते की ती या प्रकरणातून पुढे जात आहे आणि तिला आता कोणत्याही वादात पडायचे नाही. हेही वाचा : Aditi Rao Hydari: कान्समध्ये अदिती राव हैदरीच्या पारंपरिक लूकची चर्चा; ट्रान्सपरंट साडीत जिंकली चाहत्यांची मनं