… आणि मुंबई चक्क थांबली

मुंबई : मुंबई शहर म्हणजे नेहमी स्वत:च्या गडबडीत आणि गोंधळात असणारे शहर… पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक दिली आणि चक्क मुंबई थांबली. मुंबई कधी थांबत ही म्हण खोटी ठरवत आपल्या खास मुंबईच्या स्पिरिटचा अनुभव देत मुंबई चक्क आज थांबवून दाखवली.
“Mumbai never stops”, they say!
Well, it’s not entirely true though.
Mumbai knows when to keep going and just about when to stop. #JantaCurfew pic.twitter.com/ykZF4Qo9i2
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 22, 2020
मुंबईकरांच्या या स्पिरीटला मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी खास शैलीत दाद दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ते म्हणतात मुंबई कधी थांबत नाही, पण आता ते पूर्णत: सत्य राहीलं नाही. कधी जायचं आणि कधी थांबायचं हे मुंबईला माहित आहे, असे म्हणत त्यांनी हॅशटॅग वापरला आहे #JanataCarfew
त्यांनी आपल्या आपल्या ट्विटमध्ये मुंबईत कधीही न आढळणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यांची छायाचित्र जोडली आहेत. त्यात क्वचित कोणीतरी रस्त्यावर दिसत आहे. त्यांनी हा ट्विट करताच तासाभरात त्याला 2100 लाईक मिळाले तर 500 जणांनी ते रिट्विट केले. त्यावर शेकडो प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देतान एक नेटकरी म्हणतो, मुंबई कधीच थांबत नाही, पण जेंव्हा खांद्याला खांदा लावून लढण्याची वेळ येते तेंव्हा मुंबईकर सरकारला सहकार्य करतात. मुंबई पोलिसांचे आभार, तुमच्याशिवाय हे शक्य नसते.
T 3478 – Marine Drive, Mumbai this morning .. this is what National discipline means .. JAI HIND ?? !!#JanataCurfew #IndiaFightsCorona #Covid19 pic.twitter.com/jbYPpDgOLS
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 22, 2020
महानायक अमिताभ बच्चन यांनीही मरीन ड्राईव्हवरील भागातील छायाचित्र ट्विट केले आहे. त्यांनी लिहले आहे, “याला म्हणतात राष्ट्रीय शिस्त’.
पंतप्रधान मोदी यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात रविवारी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घरात बसून जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन करण्यात आले. या छायाचित्रांवरून कोरोनाला पराभूत करण्यासाठी मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादाची प्रचिती आली.





