पेशावर – उत्तर पश्चिम पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात एका डोंगरात एका पुरातन हिंदू मंदिराचा शोध लागला आहे पाकिस्तानी पुरातत्व खात्याच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे मंदिर 1,300 वर्षे प्राचीन आहे.
या प्रदेशातील बारिकोट घुंडई या भागात खोदकाम सुरु असताना हे मंदिर सापडले. खैबर पख्तूनख्वाच्या पुरातत्व विभागाच्या प्रमुखांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे हे मंदिर भगवान विष्णूचे आहे 1,300 वर्षांपूर्वी हिंदू राजवटीत हे मंदिर बांधण्यात आले होते हिंदू शाही किंवा काबुल शाही नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिंदू राजवंश काळात हे मंदिर उभारण्यात आले. या राजाने पूर्व अफगानिस्तान, गंधार, आताचे पाकिस्तान आणि सध्याचा उत्तर पश्चिम भारत या प्रदेशात राज्य केले होते.
या खोदकामात सैनिकांच्या छावणीचे अवशेष आणि पहारा करण्याच्या जागेचे अवशेषही मिळाले आहेत मंदिराजवळ एक पाण्याचे तळेही सापडले आहे. स्वात जिल्ह्यात सहसा बौद्ध मंदिरे सापडतात. पण एखादे हिंदू मंदिर सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.