टीव्ही अँकरने नवनीत राणांना विचारले – हनुमानाचे नाव हनुमान कसे पडले? उत्तर देता न आल्याने युजर्सनी उडवली खिल्ली

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठणाच्या मुद्यावरून चर्चेत आहेत. दिल्लीत हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्यापासून जनतेला मुक्त करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचे पठण करत आहोत. या विषयावर नवनीत राणा एका टीव्ही चॅनलला मुलाखत देत होत्या. ज्यामध्ये त्या एका प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत. या घटनेनंतर लोकांनी नवनीत राणा यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली आहे.
या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही –
टाईम्स नाऊ नवभारत वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान अँकर नाविका कुमार यांनी नवनीत राणा यांना विचारले की, ‘जर तुम्ही हनुमानजींचे इतके मोठे भक्त आहात, तर सांगा की हनुमानजींना हनुमान हे नाव कसे पडले?’ यावर नवनीत राणा म्हणाल्या की, हनुमानजी रामाचे सेवक होते, हनुमानजी रामाला फाॅलो करणारे होते.
अँकरने पुन्हा विचारले की, ‘हनुमानजीचे नाव आधी हनुमान नव्हते, हनुमान कसे झाले?’ नवनीत राणा हसल्या आणि म्हणाल्या की, हनुमान घेऊन जाल तर इतिहास ही वाचला जाईल. मी हनुमान चालिसा वाचली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेन. दरम्यान, या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्यांसोबतच सामान्य सोशल मीडिया वापरकर्तेही त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
काँग्रेस नेत्यांनी असा मारला टोमणा –
काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी व्हिडिओ शेअर करून सर्व धर्मांध भक्तांची अवस्था अशी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कट्टर हनुमान भक्तpic.twitter.com/8UuhJlc3Un
— Ranvijay Singh (@ranvijaylive) May 16, 2022
सोशल मीडिया वापरकर्त्यांची प्रतिक्रिया –
हा व्हिडिओ रणविजय सिंह नावाच्या ट्विटर हँडलने शेअर केला आहे आणि कट्टर हनुमान भक्त असल्याची टिप्पणी केली आहे. अभिषेक गोयल यांनी लिहिले – तथाकथित हनुमान भक्तांचा पर्दाफाश झाला. @dr_chayanika नावाचा ट्विटर वापरकर्ता लिहिते की, दांभिक हनुमान भक्तांना हे देखील माहित नाही की, पवनपुत्राने सुर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले होते. त्यावेळी इंद्राने रागात येऊन पवनपुत्राच्या दिशेने वज्र फेकले. तेव्हा ते वज्र त्यांच्या हनुवटीला लागले आणि हनुवटी फुटली. त्यामुळे त्यांचे नाव हनुमान झाले.
प्रदीप नावाच्या युजरने टिप्पणी केली आहे की, नरेंद्र प्रताप नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिले आहे की, हे अजिबात योग्य नाही, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न का विचारले जात आहेत, ‘नाविका जी यांनी हनुमान भक्तांना असे अवघड प्रश्न विचारू नयेत. आम्ही या प्रश्नांचा तीव्र निषेध करतो, असे म्हणत नवनीत राणा यांची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, अॅंकर जेव्हा प्रश्न विचारत होती तेंव्हा नवनीत राणा यांचे पती आमदार रवि राणा हे देखील त्यांच्यासोबत होते मात्र, त्यांनीही या प्रश्नावर काहीही उत्तर दिले नाही. सोशल मीडियावर या घटनेनंतर अनेक मीम्स ही बनवण्यात आले असून ते जोरदार व्हायरल होत आहेत.





