Chand Mera Dil: चांद मेरा दिल (Chand Mera Dil) हा रोमँटिक ड्रामा चित्रपट २२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. अनन्या पांडे आणि लक्ष्य यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये रिलीजपूर्वीच चांगली चर्चा होती. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांना आवडले होते. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना अभिनय आवडला असला तरी कथा अपेक्षेइतकी प्रभावी वाटली नाही. चित्रपटाची कथा आरव आणि चांदनी या तरुण जोडप्याभोवती फिरते. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेम इतकं वाढतं की दोघे कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करतात. पण कमी वयात आलेल्या जबाबदाऱ्या, करिअरचा ताण आणि नात्यातील अपेक्षा यामुळे त्यांच्या आयुष्यात दुरावा निर्माण होतो. यानंतर चित्रपटात नातं, वेदना, गैरसमज आणि प्रेमाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. (Chand Mera Dil) Chand Mera Dil: चित्रपटातील सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे अनन्या पांडे आणि लक्ष्य यांचा अभिनय. अनन्याने याआधीच्या चित्रपटांच्या तुलनेत खूपच सुधारलेला अभिनय केला आहे. अनेक प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. चित्रपटात एकही प्रसंग असा नाही जिथे ती कमकुवत वाटते. त्यामुळे अनन्याला ट्रोल करणाऱ्यांनाही हा चित्रपट पाहिल्यानंतर आश्चर्य वाटू शकतं. (Chand Mera Dil) लक्ष्यनेही आपल्या भूमिकेत पूर्ण ताकद लावली आहे. त्याच्या अभिनयात काही ठिकाणी रणबीर कपूर यांची झलक जाणवते. प्रेम, राग, वेदना आणि भावनिक संघर्ष त्याने प्रभावीपणे साकारला आहे. संपूर्ण चित्रपट मुख्यतः अनन्या आणि लक्ष्यभोवती फिरतो. इतर कलाकारांना फारसा वाव मिळालेला नाही. (Chand Mera Dil) चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केलं आहे. त्यांनी याआधी वेगळ्या धाटणीचे रोमँटिक चित्रपट केले आहेत. या चित्रपटाची सुरुवात खूपच चांगली होते. मात्र इंटरव्हलनंतर कथा भरकटल्यासारखी वाटते. सेकंड हाफमध्ये पटकथा संथ आणि गोंधळलेली वाटते. काही प्रसंग अनावश्यक लांबवले गेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक काही वेळाने चित्रपट संपण्याची वाट पाहू लागतात. chand mera dil film review चित्रपटाची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्याची दिशा हरवलेली कथा. नात्यांमधील ताण, घटस्फोटानंतरचं आयुष्य आणि अपेक्षांचा संघर्ष वास्तववादी वाटतो. पण क्लायमॅक्सपर्यंत पोहोचताना चित्रपट पुन्हा जुन्याच फॉर्म्युलाकडे वळतो. त्यामुळे वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न अर्धवट राहिल्यासारखा वाटतो. (Chand Mera Dil) एकूणच, जर तुम्हाला अनन्या पांडे आणि लक्ष्यचा दमदार अभिनय पाहायचा असेल तर हा चित्रपट एकदा पाहता येईल. पण हटके आणि घट्ट कथा अपेक्षित असेल तर कदाचित थोडी निराशा होऊ शकते.