Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडे “तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी” चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विविध ठिकाणी अनन्या मुलाखती देत आहे. अशाच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्याने तिला भेडसवणारी एक समसा शेअर करत त्यावर उपाय देखील सांगितला आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिला जी समस्या भेडसावत आहे तिच समस्या अनेकांना भेडसावत असू शकते, असा दावा तिने केला आहे. अनन्याला डावी उजवी दिशा ठरवताना अडचणी येतात. ती अनेकदा विसरते की तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे आणि उजवीकडे कोणती दिशा आहे. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री ही समस्या शेअर केली आहे. अनन्या याविषयी बोलताना म्हणाली, “मला डावी-उजवी समस्या आहे. म्हणजे, मला नेहमीच स्वतःला आठवण करून द्यावी लागते की कोणती बाजू उजवी आहे आणि कोणती डावी आहे.” बहुतेक लोकांसाठी ही एक समस्या आहे आणि लोक अनेकदा एक हात दाखवतात आणि दुसरी दिशा सांगतात. यावर अनन्याने एक युक्ती सांगितली आहे. ती स्वतः देखील ती वापरत असल्याचे तिने स्पष्ट केले. चित्रपटात दिग्दर्शक ज्या पद्धतीने फ्रेम पाहण्यासाठी चित्रपट बनवताना दिसतात, त्या पोजमध्ये हात ती ठेवते. अनन्या म्हणाली, “बघा. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमचा डावा हात L बनवतो. तर ही माझी योग्य दिशा लक्षात ठेवण्याची पद्धत आहे.” कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अभिनेत्री अनन्या पांडे हिच्याकडे अनेक चित्रपट असून, पुढील वर्षात ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हेही वाचा : “पाणी, जंगल आणि जमीन धोक्यात…” ; काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त खरगे यांची मोदी सरकारवर टीका