Anant Defence : अनंत डिफेन्सला ‘स्टेट चॅम्पियन्स एमएसएमई ऑफ द ईअर २०२६’ पुरस्कार
Anant Defence :

Anant Defence : आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त नवी मुंबई येथील सिडको भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात अनंत डिफेन्स सिस्टीम प्रा. लि.चे संस्थापक चेतन धारिया यांना ‘स्टेट चॅम्पियन्स एमएसएमई ऑफ द ईअर २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये रोख असे आहे.
राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील उद्योजकांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्यभरातील सुमारे दोन हजार उद्योजकांची उपस्थिती होती. तसेच उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि उद्योग आयुक्त यांचीदेखील उपस्थिती होती.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात उद्योजकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. राज्यातील एमएसएमई क्षेत्राने रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावल्याचेही त्यांनी नमूद केले.


