Avika Gor: आरशात स्वतःला पाहून ढसाढसा रडली होती ‘आनंदी’; १३ किलो वजन कमी करत अविका गौरने घडवला स्वतःचा नवा प्रवास
Avika Gor अविकाने काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले होते. तिने लिहिले होते की, एका रात्री ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःचे वाढलेले वजन पाहून तिला रडू कोसळले. हात-पाय सुटलेले, पोट वाढलेले आणि स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची जाणीव तिला झाली.

Avika Gor: ‘बालिका वधू’ मालिकेतून घराघरात आनंदी म्हणून ओळख मिळवणारी अभिनेत्री अविका गौर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अविकाने अभिनयासोबतच तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळेही अनेकांची मने जिंकली आहेत. एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे ती स्वतःवर नाराज झाली होती. इतकेच नव्हे, तर आरशात स्वतःला पाहून ती रडलीही होती. मात्र त्यानंतर तिने स्वतःला बदलण्याचा निर्धार केला आणि तब्बल १३ किलो वजन कमी करत प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला.
अविकाने काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले होते. तिने लिहिले होते की, एका रात्री ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःचे वाढलेले वजन पाहून तिला रडू कोसळले. हात-पाय सुटलेले, पोट वाढलेले आणि स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची जाणीव तिला झाली.
अविकाच्या मते, जर वजन वाढण्यामागे थायरॉईड किंवा पीसीओडीसारखी वैद्यकीय समस्या असती, तर ती वेगळी गोष्ट होती. मात्र तिच्या बाबतीत असे काही नव्हते. चुकीचा आहार, कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणे, हीच तिच्या वाढलेल्या वजनामागची कारणे होती. आपल्या शरीराला योग्य काळजी मिळायला हवी होती, पण आपणच त्याचा आदर केला नाही, अशी कबुली तिने दिली होती.
/movietalkies/media/media_files/2026/05/09/avika-gor-1-2026-05-09-18-42-18.jpg)
Actress Avika Gor
वाढत्या वजनाचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरही झाला. अविकाला नृत्याची खूप आवड आहे. मात्र वजन वाढल्यानंतर ती डान्स करतानाही सतत आपण कसे दिसत आहोत, याचाच विचार करत असे. त्यामुळे तिला स्वतःचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटू लागले. ती स्वतःलाच सतत दोष देत राहिली आणि त्यामुळे तणाव, चिडचिड आणि अस्वस्थता वाढली. या मानसिक ताणाचा परिणाम तिच्या जवळच्या नात्यांवरही झाला आणि ती अनेकदा रागावू लागली होती.
याच काळात अविकाच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला. तिने ठाम निर्णय घेतला की, आता स्वतःला बदलायचेच. मात्र हा बदल एका दिवसात झाला नाही. तिने हळूहळू चांगल्या सवयी लावण्यास सुरुवात केली. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण तिने हार मानली नाही. तिच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या मित्रांनीही तिला सातत्याने पाठिंबा दिला.
View this post on Instagram
अविकाने सातत्य, संयम आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल १३ किलो वजन कमी केले. आज तिचा फिट आणि आत्मविश्वासपूर्ण लूक चाहत्यांना खूप आवडतो. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदी या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ मालिकेत तिने साकारलेली रोली ही भूमिकाही गाजली. याशिवाय ‘लाडो : वीरपूर की मर्दानी’, ‘झलक दिखला जा ५’, ‘फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी ९’, ‘मॅन्शन २४’ आणि ‘१९२० : हॉरर्स ऑफ द हार्ट’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटांतही ती झळकली.
वैयक्तिक आयुष्यातही अविकाने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तिने तिचा दीर्घकाळचा मित्र आणि सामाजिक कार्यकर्ता मिलिंद चंदवानी याच्यासोबत विवाह केला आहे. अभिनय, फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधत अविका आज अनेकांसाठी प्रेरणेचे उदाहरण ठरत आहे.





