Nevasa : नेवासा तालुक्यात गोरगरिबांना मिळणार आनंदाचा शिधा; आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची माहिती
Nevasa : दुष्काळामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक चटक्यांचा सामना करावा लागत असताना काही बचत गट आणि फायनान्स कंपन्या कर्जदारांना तगादा लावत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

नेवासे : दुष्काळाच्या काळ्या छायेत होरपळणाऱ्या गोरगरीब जनतेला दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेना पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी केले. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा नामदार एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली या दुष्काळातही सामान्य जनता, शेतकरी आणि लाडक्या बहिणींना आधार देण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने भरीव मदत केली जाणार असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी नेवासा येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार लंघे – पाटील म्हणाले की, “महायुती सरकार हे सर्वसामान्यांच्या मदतीसाठी भक्कमपणे उभे आहेच,पण त्याचबरोबर आपला शिवसेना पक्षसुद्धा या संकट काळात गोरगरिबांच्या मदतीला धावून येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की, या दुष्काळात एकही गरजू उपाशी राहता कामा नये आणि त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आपला शिवसेना पक्ष त्यांना आनंदाचा शिधा देवून त्यांची दिवाळी गोड करणार आहे.”
शिवसेनेचा मदतीचे हात!
नेवासे तालुक्यातील गोरगरीब आणि काही गरजवंत कुटुंबांना दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचे टँकरही आगामी काळात पाणी टंचाईची दाहकता ओळखून जिथे गरज असेल तिथे शिवसेनेच्या माध्यमातून मोफत पाण्याचे टँकर पुरवले जाणार आहेत. तसेच शेतकरी मदत केंद्र उभारून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी शिवसेना मदतीसाठी धावून येणार आहे.
लाडक्या बहिणीच्या मदतीला आमदार धावले!
दुष्काळामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक चटक्यांचा सामना करावा लागत असताना काही बचत गट आणि फायनान्स कंपन्या कर्जदारांना तगादा लावत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यावर आमदार लंघे – पाटील यांनी कडक शब्दात फायनान्स कंपनीलाही आपल्या कडक शब्दात इशारा दिला आहे.
पत्रकार परिषद सुरू असतानाच एका लाडक्या बहिणीने थेट आमदारांना फोन करून फायनान्स कंपनी तगादा लावत असल्याची व्यथा मांडली. क्षणाचाही विलंब न लावता आमदार लंघे – पाटील यांनी थेट फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यालाच फोन लावून खड्या शब्दात ताकीद दिली. “दुष्काळात माझ्या लाडक्या बहिणीला त्रास द्यायचा नाही, सक्तीची वसुली खपवून घेतली जाणार नाही” अशा कडक शब्दात सुनावल्याने संबंधित लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही फक्त सत्तेसाठी नसून, संकट काळात जनतेच्या मदतीसाठी धावून जाणारा पक्ष आहे, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी भावना यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.





