Video : 1 रुपयांत ईडली विकणाऱ्या अम्मा ते जुगाड करणारे लोहार यांचा सन्मान करणारे ‘महिंद्रा’

Updated On:

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात. दररोज नवनवीन व्हिडीओ शेअर करत महिंद्र आपली मतं व्यक्त करताना दिसतात. अनेकदा व्हिडीओमधील कर्तबगारी पाहून कौतुक करतात. तर टॅलेंट असणाऱ्या गरजवंतांच्या मदतीला धावूनही जातात. टॅलेंट अन् निस्वार्थी लोकांची दखल घेणारे उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सर्वांना परिचीत आहेत.

आनंद महिंद्रा यांनी नुकतच तामिळनाडू येथील ईडली अम्मा नावाच्या आजीला एक खास गिफ्ट दिलं. या महागाईच्या काळात केवळ एक रुपयात इडली विकणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी घर दिलं. याबद्दल आनंद महिंद्रा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना आनंद वाटण्यासाठी समर्पित केलं, अशा व्यक्तीला छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मोठा आनंदच असू शकत नाही. गेल्या 37 वर्षांपासून इडली अम्मा स्थलांतरित आणि गरजूंना फक्त एक रुपयात इडली देतात. या इडली अम्माच्या कामाची दखल महिंद्रा यांनी घेतली.

काही दिवसांपूर्वीच सांगलीमधील देवराष्ट्रे परिसरातील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टापायी जुगाड करून स्वबळावर मिनी जिप्सी तयार केली होती. तयार केलेल्या जिप्सीमुळे दत्तात्रय लोहार यांचं देशभरात कौतुक केलं गेलं. त्याची दखल आनंद महिंद्रांनी घेतली होती. तसेच महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांना चक्क बोलेरो देतो असं ट्विट केले होतं. त्यानंतर महिंद्रा कंपनीने दत्तात्रय लोहार यांना नवी कोरी बोलेरो दिली. तसेच दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेली मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीने घेतली.


गेल्या वर्षाच्या अखेरीस आनंद महिंद्रांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये हात आणि पाय नसलेली दिव्यांग व्यक्ती मॉडिफाईड रिक्षा चालवताना दिसत होती. या व्हिडीओमुळे आनंद महिंद्रा प्रभावित झाले होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, हा व्हिडिओ पाहून आपण अवाक झालोय. हे गृहस्थ शारीरिक आव्हानांना तोंड देतायत, परंतु निसर्गाने त्यांना जे काही दिले त्याबद्दल ते आनंदी आणि कृतज्ञ आहेत. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीला नोकरीची ऑफर दिली. तसेच व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी लोकांना मदतीची विनंती केली होती.

याशिवाय आनंद महिंद्रा हे क्रीडापटूंचं कौतुक करण्यातही नेहमी अग्रेसर दिसून येतात. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला होता. त्यावेळी महिंद्रा यांनी कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या युवा क्रिकेटपटूंनी थार एसयूव्ही कार भेट देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी भारतीय संघातील सहा खेळाडूंना सहा थार एसयूव्ही कार भेट दिल्या होत्या. या खेळाडूंमध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश होता.

एकंदरीतच आनंद महिंद्रा हे केवळ सोशल मीडियावर ऍक्टीव्ह नसतात. तर टॅलेंटेड लोकांचा आणि निस्वार्थ भावनेने लोकांची मदत करणाऱ्यांची कदरही करतात.

आणखी संबंधित बातम्या

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर माजी राजदूत अकबरुद्दीनसह तिघांची नियुक्ती

2026-08-24 19:54:26

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर माजी राजदूत अकबरुद्दीनसह तिघांची नियुक्ती

हिरवळ, पाणी आणि नितळ शांतता..! देशातील स्वर्गाहूनही सुंदर गाव पाहून आनंद महिंद्राही भारावले, Video पाहा

2025-07-07 16:45:43

हिरवळ, पाणी आणि नितळ शांतता..! देशातील स्वर्गाहूनही सुंदर गाव पाहून आनंद महिंद्राही भारावले, Video पाहा

आमच्यासाठी प्रेरणा आहे..! आनंद महिंद्रा यांनी केलं चिनाब पुलाच्या 'शिल्पकार' माधवी लता यांचे कौतुक ! पोस्ट चर्चेत...

2025-06-10 16:37:17

आमच्यासाठी प्रेरणा आहे..! आनंद महिंद्रा यांनी केलं चिनाब पुलाच्या 'शिल्पकार' माधवी लता यांचे कौतुक ! पोस्ट चर्चेत...

Anand Mahindra : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर आनंद महिंद्रा यांचं ट्विट चर्चेत, स्पष्टच म्हणाले....

2025-04-05 13:33:20

Anand Mahindra : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर आनंद महिंद्रा यांचं ट्विट चर्चेत, स्पष्टच म्हणाले....

Anand Mahindra : 'कामाचा दर्जा महत्त्वाचा असतो, कामाचे तास नाही...'; आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले मत

2025-01-11 18:23:09

Anand Mahindra : 'कामाचा दर्जा महत्त्वाचा असतो, कामाचे तास नाही...'; आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले मत