पिंपरी | …अन नदीपात्रातील कचरा उचलला

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे परिसरात रोगराई निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबत दै. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेने येथील कचरा उचलून परिसरात साफसफाई केली
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेला कचरा कुजतो आणि त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. तसेच त्यामुळे मच्छरांचे प्रमाणही वाढते. अशाच प्रकारे पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. याबाबत दै. ‘प्रभात’मध्ये १४ जून रोजी फोटोसह वृत्त प्रसिद्ध झाले.
या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्रातील कचरा उचलून परिसराची साफसफाई केली. तसेच कचरा साचलेल्या ठिकाणी रोगराई प्रतिबंध करणारी केमिकल पावडर टाकण्यात आली.
एवढेच नव्हे तर या ठिकाणी कचरा, निर्माल्य व प्लॅस्टिक टाकू नये, स्वच्छता राखा, असा फलक लावण्यात आला आहे. नागरिकांनी दै. प्रभात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग या दोघांचेही आभार मानले आहेत.





