पिंपरी | विद्यार्थ्यांना ग्रीन बिल्डिंग संकल्पना अभ्यासण्याची संधी – पूर्वा केसकर

पिंपरी, (प्रतिनिधी) – इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) माध्यमातून एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन (एसबीपीआयएम) मधील विद्यार्थ्यांना ग्रीन बिल्डिंग संकल्पना तसेच आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी मिळणार आहे.
यामध्ये वास्तुरचनेत प्रामुख्याने विचारात घेतले जाणारे पाण्याची उपलब्धता, शुद्ध हवा, कमीत कमी कचरा, कार्बन उत्सर्जन अशा विविध बाबींची माहिती मिळेल.
याचा तुमच्या पुढील आयुष्यामध्ये फायदा होऊन चांगले वास्तुविशारद म्हणून ख्याती मिळवाल. असे मार्गदर्शन ‘आयजीबीसी’ च्या संचालक आर्किटेक्ट पूर्वा केसकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित एसबीपीआयएम येथे आयजीबीसीच्या स्टुडन्ट चॅप्टरचे उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी हृषिकेश मांजरेकर, नम्रता धामणकर, विष्णू नायर, प्रभारी प्राचार्या शिल्पा पाटील, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी, लक्ष्मण तोरगळे आदी उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आयजीबीसी स्टुडंट चॅप्टरच्या स्थापनेनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन ऋतुराज कुलकर्णी, धनश्री झडगावकर यांनी केले. सूत्रसंचालन नीलिमा भिडे, ग्रिश्मी रेडकर आणि सुकन्या गावडे यांनी केले. आभार नीलिमा भिडे यांनी मानले.

