Video : खळबळजनक! मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यावर अज्ञाताकडून गोळीबार

Updated On:

लोणंद (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदीप कोंडे यांच्यावर भादे गावच्या हद्दीत मोर्वे-वाघोशी रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात तरुणांकडून गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेत प्रसाद कोंडे यांच्यावर हल्लेखोरांकडून दोन गोळ्या झाडल्यानंतर सुरक्षा रक्षकाकडून देखील अज्ञाताना भीती दाखवण्यासाठी प्रत्युत्तरादाखल हवेत गोळीबार केल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेत सुदैवाने कसलीच जीवित हानी झालेली नाही.

मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे हे वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा येथील दर्शन घेऊन मोर्वे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्या गाडीतून लोणंदच्या दिशेने जात असताना भादे गावचे हद्दीत सदर घटना घडली.

दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री फडणवीस

या घटनेची माहिती मिळताच खंडाळा, लोणंद आणि शिरवळ या तीनही पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सपोनि विशाल वायकर, पोउनि मोरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटना नक्की कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. घटनास्थळाला फलटणचे उप अधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Punjab News : पंजाबमध्ये मोठी कारवाई ! तरनतारन येथे दोन घुसखोर ठार

2026-10-02 16:03:29

Punjab News : पंजाबमध्ये मोठी कारवाई ! तरनतारन येथे दोन घुसखोर ठार

School Shooting in Philippines : फिलिपीन्समध्ये हायस्कूलमध्ये गोळीबार; 3 जण ठार

2026-09-18 21:30:15

School Shooting in Philippines : फिलिपीन्समध्ये हायस्कूलमध्ये गोळीबार; 3 जण ठार

Panjab News : पंजाबमध्ये खळबळ ! आपच्या 'या' नेत्याची गोळ्या झाडून हत्या

2026-08-30 16:42:30

Panjab News : पंजाबमध्ये खळबळ ! आपच्या 'या' नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Sangli News : सांगली हादरली! भरवस्तीत नेत्याच्या घरात घुसून गोळीबार

2026-06-11 22:05:33

Sangli News : सांगली हादरली! भरवस्तीत नेत्याच्या घरात घुसून गोळीबार

अग्रलेख : उद्रेकाची दखल

2026-05-25 06:00:13

अग्रलेख : उद्रेकाची दखल