वृद्धिमान साहाबाबत तपास सुरु होणार
Updated On:

मुंबई – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने केलेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समिती या आठवड्यात तपास सुरु करणार आहे.
साहा याने बीसीसीआय, अध्यक्ष सौरव गांगुली व मुख्य प्रसिक्षख राहुल द्रविड यांच्यावरही काही आरोप केले होते. तसेच एका पत्रकारानेही मुलाखतीसाठी धमकावल्याचे सांगितले होते. आता या संपूर्ण प्रकरणात कीती तथ्य आहे याचा तपास या समितीमार्फत होणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. दरम्यान या पत्रकाराचे नाव घेण्यास साहा याने पुन्हा एकदा नकार दिला आहे.
टॅग्स:





