‘पोलिओ’मुळे दोन्ही पाय गेले…, त्यात भर म्हणजे घरची आर्थिक परिस्थितीही जेमतेमच…, स्वतःच्या पायावर उभाचं राहता येत नाही, तर आयुष्याचा गाडा पुढे हाकायचा तरी कसा…, जन्मदात्या आई – वडिलांचा सांभाळ कसा करायचा असे प्रश्न-८५टक्के दिव्यांग असलेल्या नवनाथ औटी यांना सतावत होते…
मात्र, या खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी-यातून नवनाथ यांनी मोठी भरारी घेतली आहे. आज तालुक्यात – नवनाथ औटी हे नाव स्क्रीन प्रिंटिंग उद्योगात सन्मानाने घेतलं जातं…, स्वतः स्थिरस्थावर झाल्यानंतर आता ते इतर दिव्यांगांसाठी देखील काम करतायेत…, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नवनाथ औटी यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबाबत जाणून घेऊयात….