सरकारकडे मदतीची मागणी
\nनिकिताच्या वडिलांनी अत्यंत भावूक होऊन भारत सरकार आणि तेलंगणा सरकारकडे विनंती केली आहे. “माझ्या मुलीचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आम्हाला मदत करावी. तसेच त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
दूतावास आणि पोलिसांची कारवाई
\nवॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेतली असून ते निकिताच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. स्थानिक प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली जात आहे. हॉवर्ड काउंटी पोलिसांनी अर्जुन शर्माविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी केले आहे. तो भारतात पळून गेल्याची दाट शक्यता असल्याने अमेरिकन तपास यंत्रणा आता भारतीय यंत्रणांशी संपर्क साधण्याची शक्यता आहे.