हर्षवर्धन राणेच्या चित्रपटाच्या सेटवर जल्लोषादरम्यान घडली दुर्घटना, पण…

Harshvardhan Rane | अभिनेता हर्षवर्धन राणे ‘एक दीवाने की दीवानियत’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. मात्र त्यापूर्वी या चित्रपटासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या सिनेमाच्या पार्टीमध्ये हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
‘एक दिवाने दिवानीयत’ चे शेवटचं शूट चंदीगडमध्ये सुरू होतं. हे शूट पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटाच्या टीमने पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये हेलियम गॅसचे फुगे देखील लावण्यात आले होते. त्यावेळी अचानक ते फुगे फुटल्याने आगीचा एकच भडका उडाला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हर्षवर्धन राणेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. Harshvardhan Rane |
हर्षवर्धन राणे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘एक दीवाने की दीवानियत’ चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा BTS व्हिडिओ शेअर केला. त्यांनी लिहिलं, “जेव्हा एखादा अपघात तुमचं काहीही बिघडवू शकत नाही, तेव्हा समजावं की देव तुमच्या चित्रपटासोबत आहे. सर्वजण सुखरूप होते याचा आनंद आहे. आमची संपूर्ण टीम सलग पाच रात्रीच्या शिफ्टमध्ये शूटिंग करत होती आणि ‘एक दीवाने की दीवानियत’ चित्रपट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत होती, तेव्हाच आमच्या मागे 8-9 फूट अंतरावर हेलियम फुगे फुटले.” व्हिडिओमध्ये हर्षवर्धन राणे अचानक झालेल्या स्फोटामुळे घाबरलेले दिसतात आणि त्यानंतर ते क्रू मेंबर्सना शांत करताना दिसतात. Harshvardhan Rane |
View this post on Instagram
दिग्दर्शक मिलाप जावेरी ‘ एक दिवाने की दीवानियत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर मुश्ताक शेख यांनी चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे. येत्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
दरम्यान, ‘सनम तेरी कसम’ नंतर हर्षवर्धन राणे इंडस्ट्रीतून गायब झाला होता. ‘सनम तेरी कसम’ चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांची जोडी होती आणि हा चित्रपट हिट ठरला होता. आता बऱ्याच कालावधीनंतर तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एन्ट्री करतोय. Harshvardhan Rane |
हेही वाचा:



