सिद्धू मुसेवालांच्या मारेकऱ्यांसोबत अमृतसर पोलिसांची चकमक सुरू; एक गुंड ठार

अमृतसर – पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील अटारी गावात पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या चिचा भकना गावात सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांसोबत अमृतसर पोलिसांची चकमक सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगरुप सिंह रुपा आणि मनप्रीत सिंह ऊर्फ मन्नू कुसा अशी दोघा मारेकऱ्यांची नावे आहेत. ते मुसेवाला यांच्या हत्येनंतर फरार झाले होते. हे दोन्ही गुंड गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
दोन्ही शूटर पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघेही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडीसाठी काम करतात. दरम्यान, चकमकीत एक गुंड ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत पंजाब पोलीस दलातील तीन जवान जखमी झाले आहेत.
“मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक यांचा सक्रिय सहभाग”; ईडीने न्यायालयात सादर केले प्रतिज्ञापत्र
सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधील आप सरकारनं 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोनजण जखमी झाले होते. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.
जेव्हा आमिर खानने दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा!


