कंगना राणावतच्या मारहाण प्रकरणावर अमृतपाल सिंगची प्रतिक्रिया ; म्हणाले,”कुलविंदरचे धाडस हे पंजाबच्या”

Amritpal Singh On Kangana Ranaut । पंजाबमधील खादूर साहिब येथील अपक्ष खासदार अमृतपाल सिंग यांनी मंडी, हिमाचल येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना येणार यांना चंदीगड विमानतळावर मारहाण करणाऱ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मारहाण करणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबलला पाठिंबा दिलाय. अमृतपालने कंगनाला मारणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरचे धाडसी म्हणून कौतुक केले आहे.
कुलविंदरचे धाडस पंजाबच्या मुलींच्या ताकदीचे उदाहरण Amritpal Singh On Kangana Ranaut ।
अमृतपालने सोशल मीडियावर कुलविंदर कौरच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. यामध्ये अमृतपालने लिहिले की, “आम्ही आमची बहीण कुलविंदर कौरच्या समर्थनार्थ एकजुटीने उभे आहोत. कुलविंदरचे धाडस हे पंजाबच्या मुलींच्या ताकदीचे उदाहरण आहे.” असे म्हटले आहे.
अपक्ष खासदार अमृतपाल सिंह यांनी लिहिले की, “कंगना राणावतने शीख समुदाय, आमचे शेतकरी आणि पंजाबच्या मातांचा वारंवार अपमान आणि छळ केला आहे. कुलविंदरने आमच्या समुदायाप्रती दाखविलेल्या अनादराला आदराने आणि लवचिकतेने प्रतिसाद दिला.” असे म्हणत तिच्या कृतीचे समर्थन केले आहे.
६ जून रोजी घडली होती घटना Amritpal Singh On Kangana Ranaut ।
चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी ६ जून रोजी भाजप खासदार कंगना राणावत यांना कानाखाली लगावली होती. निवडणूक जिंकल्यानंतर कंगना पहिल्यांदाच दिल्लीत येत होती. या घटनेनंतर कंगनाने एक व्हिडीओ जारी केला होता ज्यामध्ये तिला थकानाखाली लगावण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आली. ते म्हणाले की, मी सुरक्षित आहे पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे मी चिंतेत आहे.” असे त्यांनी म्हटले.
कुलविंदरने हल्ल्यामागचे दिले होते कारण
या घटनेनंतर कुलविंदर कौरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती “कंगनाराणावतने शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलनात सहभागी महिला १००-२०० रुपये घेऊन निषेध करत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी माझ्या आईचाही त्या आंदोलकांमध्ये समावेश होता. या घटनेनंतर कुलविंदरला निलंबित करण्यात आले. त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे.
अलीकडेच कुलविंदर कौर यांची बेंगळुरू येथे बदली झाल्याची बातमी आली होती. मात्र, CISF कडूनही यावर प्रतिक्रिया आली. सीआयएसएफने म्हटले होते की, कुलविंदर कौर अजूनही निलंबित असून तिच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे. तथापि, तिची बदली तिच्या पतीसह बेंगळुरू येथे करण्यात आली आहे, जो देखील CISF मध्ये आहे.





