अमृतपाल सिंगकडे फक्त 1000 रुपयांची मालमत्ता ; पत्नी मात्र लाखोंची मालकीण, वाचा किती आहे संपत्ती ?

Amritpal Singh Assets । खलिस्तानी दहशतवादी आणि वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. त्याने पंजाबमधील खादूर साहिब मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला आहे, अमृतपाल सिंगला सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करून आसामच्या दिब्रुगड तुरुंगात ठेवण्यात आलंय. अमृतपाल सिंगने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काल त्याच्या काकांनी तरनतारन जिल्ह्यात उमेदवारी दाखल केली.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, अमृतपाल सिंग यांचे अमृतसरच्या रय्या बाबा बकाला येथील एसबीआय बँकेत 1,000 रुपये बँक शिल्लक आहे. याशिवाय अमृतपाल सिंग यांच्याकडे कोणतीही चल-अचल मालमत्ता नाही.
अमृतपालची पत्नी लाखोंची मालकीण Amritpal Singh Assets ।
31 वर्षीय अमृतपाल सिंह खडूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जिथे त्यांच्या नावावर एसबीआय बँकेत फक्त एक हजार रुपये आहेत. त्यांची पत्नी लाखांची मालक आहे. किरणदीप कौर यांच्याकडे 18.37 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये 20,000 रुपये रोख, 14 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 4,17,440 रुपयांचे 4,000 GBP (पाउंड) समतुल्य आहे. जे रिव्होलट लिमिटेड, लंडन, यूकेच्या खात्यात आहेत.
अमृतपाल सिंग त्याच्या आई-वडिलांवर अवलंबून असून त्याची पत्नी ब्रिटिश नागरिक असल्याचे दाखवण्यात आलंय. प्रतिज्ञा पत्रानुसार, किरणदीप कौर यूकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये भाषा अनुवादक म्हणून काम करत होत्या, परंतु आता ती गृहिणी आहे. अमृतपाल सिंग यांनी जाहीर केले आहे की, त्यांच्याविरुद्ध 12 गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत, तरीही त्यांना कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नाही.
अमृतपाल अजनाला घटनेमुळे चर्चेत Amritpal Singh Assets ।
अमृतपाल सिंग त्याच्या नऊ साथीदारांसह 23 एप्रिल 2023 रोजी आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहेत. अमृतपाल सिंग यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2008 मध्ये त्यांनी अमृतसरच्या फेरुमान येथील शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. अमृतपाल गेल्या वर्षी १८ मार्च रोजी जालंधर जिल्ह्यातून पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता.





