Amrita Singh: ८०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग आज, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी आपला ६८वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि अगदी पहिल्याच चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ या चित्रपटात त्यांनी सनी देओलसोबत काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि अमृता सिंग रातोरात स्टार बनल्या. त्यानंतर त्यांच्या वाट्याला एकामागोमाग एक चित्रपट आले. Amrita singh अमृता सिंग यांनी ‘मर्द’, ‘नाम’, ‘साहेब’, ‘चमेली की शादी’, ‘खुदगर्ज’, ‘वारिस’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळे आणि ठसठशीत अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. प्रेमप्रकरणे आणि लग्न अमृता सिंग यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं. एका काळात त्यांचं नाव सनी देओल, रवि शास्त्री आणि विनोद खन्ना यांच्याशी जोडलं गेलं, पण ही नाती पुढे टिकू शकली नाहीत. यानंतर त्यांच्या आयुष्यात सैफ अली खान आले. सैफ अमृतांपेक्षा सुमारे १२ वर्षांनी लहान होते. अवघ्या तीन महिन्यांच्या ओळखीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमृता सिख धर्मातील आणि सैफ मुस्लिम असल्यामुळे कुटुंबाच्या विरोधाच्या भीतीने त्यांनी गुपचूप निकाह केला. त्या काळात हे लग्न खूपच चर्चेत आलं. Amrita करिअरला ब्रेक, नंतर घटस्फोट लग्नानंतर अमृता सिंग यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष मुलं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्या संगोपनावर दिलं. मात्र काळानुसार सैफ आणि अमृता यांच्या नात्यात दुरावा वाढत गेला. अखेर २००४ साली दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृता सिंग यांनी पुन्हा लग्न केलं नाही. त्यांनी आपल्या मुलांसोबत एकटीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे सैफ अली खान यांनी २०१२ मध्ये करीना कपूर यांच्याशी विवाह केला. आज अमृता सिंग भलेही चित्रपटांपासून दूर असल्या, तरी एक उत्तम अभिनेत्री आणि खंबीर आई म्हणून त्यांची ओळख आजही तितकीच भक्कम आहे.