मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अनेक पैलू उलगडले आहेत. अशात अभिनेत्री अमृता खानविलकरने या चित्रपटाबाबत केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शाहीर साबळे यांच्यावर आधारित असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात अंकुश चौधरीने शाहिरांची भूमिका साकारली आहे. अमृता खानविलकर आपल्या पोस्टमध्ये म्हणते,”जन्म भूमीला,कर्म भूमीला तुम्हाला बहुमान द्यायचा असेल तर फक्त महाराष्ट्र शाहीर अनुभवून बघा. प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघताना डोळे भरून येतात … अंगावर रोमांच उभे राहतात,उर अभिमानाने भरून येतो”
पुढे ती म्हणते,”उत्तम दिग्दर्शन,छायाचित्रण,अभिनयाने नटलेला हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे केदार शिंदे अप्रतिम स्टोरी टेलिंग आणि दिग्दर्शन अंकुश चौधरी कुठेच दिसत नाही.. फक्त आणि फक्त शाहीर साबळे सना शिंदेंचे डोळे,तिची सरलता,तिची स्थिरता खूपच जीवघेणी आहे आणि अजय अतुल ह्यांच्या संगीता बद्दल जितकं बोलावं तितकं कमी.. नतमस्तक चित्रपट नक्की बघा जय जय महाराष्ट्र माझा”
View this post on Instagram
या चित्रपटात अंकुश चौधरी यांच्यासोबत अमित डोलावत, सना केदार शिंदे,अतुल काळे आदी कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसले आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.