मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाला पाठींबा देत भाजपने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानव लागलं. मात्र देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही उलट कोणतंही पद स्वीकारणार नाहीत याची माहिती आपल्याला आधीच होती असा दावा मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी केला आहे.
अमृता फणडवीस यांनी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहे. यावेळी अमृता फणडवीस यांना ठाकरे कुटुंबाबाबत प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्या म्हणाल्या,’मी दोन अडीच वर्षांपूर्वी खूप काही सांगितलं आहे. आता प्रत्येक व्यक्तीविषयी इतकी जनजागृती झाली आहे आहे सांगायला काही उरलं नाही. मी त्यांना फक्त एवढंच सांगेन की ‘सक्षम लोक कायम टिकतात, प्रतिकूल परिस्थिती कायम राहत नाही.’ असं म्हणत अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटूंबियांना सल्ला दिला आहे.
दरम्यान,देवेंद्र फडणवीस आणि आमची भेट रात्री उशिरा व्हायची अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती.अमृता फडणवीस यांनी देखील शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. देवेंद्रजी रात्री वेष बदलून शिंदेंना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातलेले देवेंद्रजी मलाही ओळखू येत नसल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.